११ वा जागतिक योग दिवस महोत्सव २१ जून रोजी – छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होणार भव्य आयोजन

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : ११ वा जागतिक योग दिवस महोत्सव यंदा दिनांक २१ जून रोजी सकाळी ५ ते ६:३० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर प्रांगणात साजरा होणार आहे. या महोत्सवाचे आयोजन पतंजली योग समिती, पतंजली महिला योग समिती यांनी केले असून ‘नॅचरल ब्युटी पार्लर’, ‘गौरीसुत प्रतिष्ठान’ आणि गोविंद अग्रवालजी यांच्याकडून हा कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला आहे.
या योग महोत्सवात शहरातील व परिसरातील असंख्य योगसाधक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, योगप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
साधकांनी आपल्या सोबत योगसाधनेसाठी चटई, सतरंजी आणावी तसेच सैल कपडे परिधान करून यावे. पावसाचे वातावरण असले तरीही कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडणार आहे. त्यामुळे मोबाईल व इतर वस्तूंसाठी कॅरीबॅग सोबत ठेवावी, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.