जळगाव पोलिसांची मोठी कारवाई : मोबाईल चोरीप्रकरणी ३३ मोबाईल जप्त, सराईत गुन्हेगार गजानन यादव अटकेत..

0

24 प्राईम न्यूज 24 Jun 2025. -जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत करत सराईत आरोपी गजानन यादव याला अटक केली आहे. या मोबाईल्सची एकूण अंदाजित किंमत सुमारे ४ लाख रुपये आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश गायत आणि एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक श्री. केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल आव्हाड आणि त्यांच्या तपास पथकाने पार पाडली.

तपासादरम्यान उघडकीस आले की आरोपी गजानन यादव मोबाईल चोरी करून ते मध्य प्रदेशातील इंदूर येथे नेऊन विक्री करत होता. पोलिसांनी तेथील मोबाईल विक्री साखळीचा शोध घेत मध्य प्रदेशातील विक्रेत्यांपर्यंत पोहोचून गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला.

सदर गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ४४९/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ३०३ (२) नुसार दाखल करण्यात आला आहे.

नागरिकांना पोलिसांचा संदेश:
जळगाव शहर किंवा जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले आहेत किंवा चोरीस गेले आहेत, त्यांनी आपल्या मोबाईलचा IMEI नंबर घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!