एरंडोल येथे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप शंभर टक्के यशस्वी..

एरंडोल (प्रतिनिधि)येथे वीस २० फेब्रुवारी पासून शिक्षकेतर कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले. संपावरील सर्व कर्मचारी महाविद्यालयाच्या आवारात एका ठिकाणी दिवसभर बसून होते.
दरम्यान त्यांच्या संपाला महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार सदर कर्मचारी संपात सहभागी झाले असून ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत आमच्या मागण्या शंभर टक्के मान्य होईपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी माहिती संघटनेचे स्थानिक अध्यक्ष जी एस वेताळे यांनी दिली आहे.