ग्रामीण उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्या मंदिर या शाळेचा 10वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…

एरंडोल (प्रतिनिधि) नुकताच माध्यमिक विद्या मंदिर या शाळेचा इयत्ता 10वीचा निरोप समारंभ पार पडला
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणविस्तार अधिकारी तथा शालेय पोषण अधिकारी श्री जे.डी .पाटील साहेब उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध विधीतज्ञ अँड.ओम त्रिवेदी , अमेरिकामूळ राहणार एरंडोल पण सध्या वास्तव्य अमेरिका येथील श्रीयुत
सुशिल बिर्ला व ग्रामीण उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन भाऊ विसपुते हे होते..
प्रारंभी मान्यवराच्या हस्ते दि

पप्रज्वन झाले तसेच अतिथींचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री सचिनभाऊ विसपुते यांचे शुभहस्ते पार पडला..
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजुषा चव्हाण यांनी प्रास्तविक सादर केले .उपशिक्षक एच डी पाटील सर तसेच शाळेच्या विद्यार्थींनी कु.दर्शना चौधरी ,अल्फिया शेख,रजिन शेख, गायत्री पाटील यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला
प्रमुख अतिथी श्री. एडवोकेटओम त्रिवेदी यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्याविषयी मार्गदर्शन केले. जीवनात पावलोपावली संधी उपलब्ध होत असतात फक्त संधी ओळखणे महत्वाचे असते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. जे. डी. पाटील सर यांनी करियर संबधी विविध कोर्स तसेच उपलब्ध संधी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले.जे घडते ते चांगल्यासाठी घडते असे सांगुन सकारात्मक दृष्टिकोन वाढविण्यास सांगितले तसेच अपयश आल्यास कोणत्याही प्रकारचा अवैधिकी विचार न करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संसाध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ विसपुते यांनी कॉलेजला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी चांगले मित्र व चांगले पुस्तक यांची संगत धरण्यात सांगितले तसेच मोबाईल, टीव्ही व व्यसन यांच्या आहारी न जाता सर्वप्रथम स्वत:च्या पायावर उभे राहाता येईल इतपत शिक्षण घेणे व तसेच व्यावसायिक शिक्षण घेणे याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले..
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.राजनंदिनी पाटील ,सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन रोजमीन शेख यांनी केले..