एरंडोल न्यायालयातर्फे जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा..

एरंडोल
(प्रतिनिधि) येथील तालुका विधी सेवा समिती, एरंडोल आणि तालुका वकील संघ, एरंडोल यांच्या संयुक्त विदयमानाने दिनांक २० फेब्रुवारी, २०२३ रोजी एरंडोल न्यायालय येथे '' जागतिक सामाजिक न्याय दिन '’ साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात "Rights to Information Act, 2005" आणि " The Maharashtra Rights to Public Service Act 2015" या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याअनुषंगाने दिनांक २० फेब्रुवारी, २०२३ रोजी एरंडोल न्यायालय येथे अॅड श्री. विलास के. मोरे, अॅड श्री. ज्ञानेश्वर बी. महाजन आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बी. ए. तळेकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, एरंडोल यांनी सदर विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ' जागतिक सामाजिक न्याय ' दिनाचे औचित्य साधून न्यायालयात येणारे वृध्द आणि दिव्यांग पक्षकार यांचेसाठी ' न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी वृंद ' आणि ' तालुका वकील संघ एरंडोल ' यांच्या संयुक्त विदयमाने एक Wheelchair चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड श्री. अजिंक्य ए.काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन अॅड श्री. मधुकर बी. देशमुख, एरंडोल यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती बी. ए. तळेकर, दिवाणी न्यायाधीश एरंडोल, श्री.विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश एरंडाेल, सहा. सरकारी अभियोक्ता डी.बी.वळवी, सहा. सरकारी अभियोक्ता चेतना कलाल, अॅड. ज्ञानेश्वर बी.महाजन सचिव तालुका वकील संघ एरंडोल, अॅड. श्री. डी.डी. पाटील, अॅड. प्रतिभा पाटील, अॅड. श्री. विलास के. मोरे, अॅड श्री. ए.ए.काळे, अॅड. श्री. आकाश महाजन व इतर विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पो.काॅ. धर्मेंद ठाकूर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस अंदाजे ६५ जणांची उपस्थिती होती.