एरंडोलला शिवजयंती उत्साहात साजरी-सजीव देखावा ठरले आकर्षण-शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन…
॥ जय जिजाऊ ॥ जय शिवरायच्या घोषणांनी पुतळा परिसर दणाणला-सायकल, मोटार सायकल रॅलींनी आणली रंगत..

एरंडोल ( प्रतिनिधि) – कोरोनाकाळात बंद असलेली शिवजयंती यंदा मात्र कोरोना नसल्यामुळे प्रचंड उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात एरंडोल शहरासह परिसरात, तालूक्यात साजरी करण्यात आली. मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ (शिवतिर्थ) राजे संभाजी पाटील समाज मंडळातर्फे संपन्न झाला. उपस्थित प्रमुख मान्यवरांसह शिवप्रेमींनी शिवरायांचे पुजन करून वंदन करण्यात आले. यावेळी सं

पन्न झालेल्या कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. ए. पी. देशमुख होते.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक देविदासभाऊ महाजन, पो. नि. ज्ञानेश्वर जाधव, नायब तहसिलदार दिलीप पाटील, पोलिस अधिकारी गणेश अहिरे, शरद बागल, निवृत्त तहसिलदार अरूण माळी, माजी सभापती शालिग्रामभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष रविंद्रअण्णा महाजन, शिवसेना ज्येष्ठ नेते रमेशअण्णा महाजन, राजू आबा चौधरी, विजयअण्णा महाजन, माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, आनंदा भगत, महाविद्यालय अध्यक्ष अमितदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, नगरसेवक प्रा. मनोज पाटील (पहेलवान), बबलू चौधरी (पहेलवान), सामजिक कार्यकर्ते गजानन पाटील, डॉ. उमेश पाटील, डॉ. बोहरी (दादा), डॉ. फरहाज बोहरी (बाबा), नगरसेवक अभिजीत पाटील, चिंतामण पाटील, डॉ. राजेंद्र देसले, प्रा. किशोर वाघ, समाज अध्यक्ष राजेंद्र अंबादास पाटील, उपप्राचार्य आर. एस. पाटील, उद्योजक समाधान पाटील, डॉ. भूषण पाटील, डॉ. प्रशांत पाटील, शेखर पाटील, सुभाष पाटील, दुर्गादास पल्लीवाळ, के. डी. बापू पाटील, डॉ. किरण पाटील, प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, पत्रकार कमरअली सैय्यद, संजय चौधरी, नितीन पाटील (बापूजी) आदींची उपस्थिती होती. यावेळी जगदीश ठाकूर, देविदासभाऊ महाजन, विजय महाजन, आनंदा भगत, अॅड. देशमुख, अरूण महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.
सायंकाळी सजविलेल्या पांढर्या शुभ्र घोड्यांच्या बग्गीवर छत्रपती शिवाजी महाराज वेषात (विक्क) आकर्षण ठरले. शहरातून वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात मिरवणूकीचे अनेक ठिकाणी पुजा, ओवाळणी करण्यात आली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसह वारीकरींनी नागरीकांचे लक्ष वेधले. धरणगांव चौफुलीवर देखील राजेंद्र शिंदे, नगरसेविका वर्षा शिंदे यांचेतर्फे शिवजयंती, देखावा सादर करण्यात आला. अनेकांनी शिवरायांना वंदन केले. समाजबांधवांसह सर्वसमावेश मिरवणूकीसाठी पोलिस बंदोबस्त चोख होता. कार्यक़्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आर. एस. पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी राकेश पाटील सर यांचेस स्वप्निल सावंत, पंकज पाटील, अजय पाटील, राज पाटील, शरद पाटील, हेमंत पाटील, गोटू पाटील आदींनी परिश्रम घेतले.