राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन यशस्वी होण्याकरिता अमळनेरात सहविचार सभा संपन्न…

अमळनेर( प्रतिनिधी )अमळनेर येथील प्रबुद्ध विहारामध्ये बौद्ध साहित्य प्रसार संस्था संचलित बौद्ध साहित्य परिषद महाराष्ट्र मार्फत आयोजित साहित्य संमेलना संदर्भात संमेलनाचे आयोजक प्रा. भरत शिरसाठ, (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )यांनी सहविचार सभा घेतली. सभेसाठी धनराज मोतीराम , डॉ अशोक सैंदाणे हे उपस्थित होते.
बैठकीत बौद्ध साहित्य संमेलन हे मानवता विकसित करणाऱ्या संमेलन आहे आज पर्यंत बऱ्याच ठिकाणी साहित्य संमेलन झाले हे बौद्ध साहित्य संमेलन आगळे वेगळे होईल, अमळनेरातील साहित्यिक लोकांना यात सामील करून बौद्ध विचार मांडणी करणाऱ्या परिवर्तनवादी लोकांना या साहित्य संमेलनाचा चांगला उपयोग घेता येईल.
यावेळी मा. शिवाजी नाना पाटील यांनी बौद्ध साहित्य संमेलन म्हणजे काय हे स्पष्ट करून त्याची आवश्यकता वर्तवली.
धनराज मोतीराय यांनी संत रविदास यांचा विचार हाच बौद्ध विचार होता हे मांडले, प्रा.भरत शिरसाठ यांनी बौद्ध साहित्य संमेलनाचा उद्देश सांगितला.
याप्रसंगी प्रा.शिवाजीराव पाटील , अशोक बि-हाडे गौतम मोरे, विश्वास पाटील, यशवंत बैसाणे, सोपान भवरे ,बापूराव ठाकरे, योगराज संदानशिव, सुनिल वाघमारे, कैलास आहिरे ,डॉ. राहुल इंगळे, डॉ. माधव वाघमारे , ह्रदनाथ मोरे, रवींद्र सोनवणे, अरूण सोनटक्के, अतुल डोळस, विजय गाढे,भानुदास गुलाले, शंकरराव तेलंग, प्रवीण बैसाणे, अर्जुन संदानशिव, विजय सपकाळे, ॲड. रणजीत बि-हाडे, ॲड शिवकुमार ससाणे, प्रा. मुकुंदा संदानशिव,संदीप सैदाणे, गौतम सपकाळे, किरण बहारे,चंद्रकांत जगदाळे, अरूण देशमुख, दाजिबा गव्हाणे, भुपेंद्र शिरसाठ,विजय वाघमारे,मीनाक्षी इंगोले तसेच विविध क्षेत्रातील कर्मचारी ,राजकीय पदाधिकारी
उपस्थित होते.