वाळू चोरीवर प्रशासनाची ढिसाळ कारवाई? ‘खिसा गरम, चोरी सुरु’चं नवं समीकरण!

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतुकीचे सत्र जोरात सुरू असून, ही वाहतूक चक्क रात्रभर शाह आलम नगर मार्गे शहरात पहाटेपर्यंत सुरूच

तालुक्यात वाळू चोरीचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. दिवसाढवळ्या ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या वाळूची ने-आण सुरू असून, प्रशासन केवळ एखाद-दुसऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून केवळ देखावा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे प्रशासनाकडून छापे आणि कारवायांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात केवळ एखाद-दुसऱ्या ट्रॅक्टरवरच कार्यवाही केली जाते. उर्वरित ट्रॅक्टर मात्र मोकळ्या रस्त्यांवरून निर्भयपणे वाळूची तस्करी करत असतात. त्यामुळे ‘खिसा गरम, चोरी सुरु’ हे समीकरण आता नागरिकांच्या चर्चेचा विषय बनले आहे सामान्य माणसाला दिसते, पण प्रशासनाला नाही?
ही अवैध वाळू तस्करी सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेत पडत आहे, मात्र प्रशासनाला ती दिसत नाही, ही बाब अधिकच संशयास्पद ठरत आहे. यामध्ये काही अधिकार्यांच्या संगनमताची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत या प्रकाराने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि या वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत वाळू ही सार्वजनिक मालमत्ता असून, तिच्या चोरीमुळे शासनाचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.