मधुकर भावे यांना जीवनगौरव पुरस्कार; २ जुलै रोजी मुंबईत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पुरस्कार वितरण सोहळा.

आबिद शेख/ अमळनेर

मुंबई – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दिले जाणारे विविध पत्रकारिता पुरस्कार २ जुलै २०२५ रोजी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना “बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मधुकर भावे यांनी जवळपास ६५ वर्षे पत्रकारितेची निष्ठेने सेवा केली असून त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप ठेवण्यात आले आहे. यापूर्वी हा गौरव दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश जोशी यांना देण्यात आला आहे.
या वर्षीचे इतर पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे:
आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार: ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे शशिकांत सांडभोर पुरस्कार (इलेक्ट्रॉनिक मिडिया): अभिजित करांडे (मुंबई तक) स्व. पत्रकार प्रमोद भागवत स्मृती पुरस्कार: अमेय तिरोडकर भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार: पांडुरंग पाटील (अमळनेर) नागोजीराव दुधगावकर पुरस्कार: सर्वोत्तम गावरस्कर (संपादक, सुराज्य दैनिक, बीड) दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार: दिनेश केळुसकर (संपादक, दैनिक हेराल्ड) सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता पुरस्कार: सीमा मराठे (सिंधुदुर्ग) स्वातंत्र्यसैनिक माणिकराव देशमुख कृषी पत्रकारिता पुरस्कार: बाळासाहेब पाटील (अँग्रोवन) संतोष पवार स्मृती पुरस्कार: भरत निगडे (पुणे) विशेष गौरव: ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव
हा पुरस्कार वितरण सोहळा २ जुलै २०२५ रोजी, दुपारी ४ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमासाठी सर्व पत्रकार, मान्यवर आणि रसिक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी राज्याध्यक्षा शोभा जयपूरकर, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके आणि मुंबई शाखा अध्यक्ष राजा आदाटे यांनी केले आहे.