मोटार सायकल चोरीचा बनाव करणारे आरोपी अखेर जेरबंद..

0

24 प्राईम न्यूज 26 Jun 2025


जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) व मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शन करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना मोटार सायकल चोरीचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या.

दिनांक २४/०६/२०२५ रोजी अशोक हिरामण मोरे (रा. दगडी मनवेल, ता. यावल) याच्याकडे चोरीची मोटार सायकल असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोहेकॉं. प्रितमकुमार पिंताबर पाटील, पोहेकॉं. यशवंत टहाकळे, पोकॉं. बबन पाटील व पोकॉं. प्रदीप सपकाळे यांनी चौकशीदरम्यान अशोक मोरे याच्याकडून बजाज कंपनीची मोटार सायकल (MH 19 CC 6640) ताब्यात घेतली.

चौकशीतून समोर आले की, सदर मोटार सायकल ही पाच वर्षांपूर्वी भुसावळ येथील एजंट जफर शेख उस्मान याच्या मार्फत प्रमोद निलेश कोळी (रा. हुडको कॉलनी, भुसावळ) याच्याकडून १६,०००/- रुपये देऊन खरेदी करण्यात आली होती. सदर मोटार सायकलवर बनावट क्रमांक प्लेट (MH 19 CC 6640) लावण्यात आली होती, तर तिचा खरा क्रमांक MH 19 DK 0755 असल्याचे निष्पन्न झाले. प्रमोद कोळी याने पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीची तक्रार दाखल करून बनाव रचल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दिनांक ३०/१२/२०१९ रोजी CCTNS नं. २८५/२०१९, भा.दं.वि. कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या बनावट चोरी प्रकरणात गुन्हा उघडकीस आणून खालील आरोपींना अटक केली:

  1. अशोक हिरामण मोरे (वय ३९, रा. दगडी मनवेल, ता. यावल) – मोटार सायकल खरेदी करणारा
  2. जफर शेख उस्मान (वय ३४, रा. रावेर, ह.मु. जाम मोहल्ला, भुसावळ) – वाहन खरेदी-विक्री एजंट
  3. प्रमोद निलेश कोळी (वय ३७, रा. हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) – बनावट चोरीचा बनाव करणारा

तिघांनाही ताब्यात घेऊन सदर मोटार सायकलसह पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव) व मा. श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोहेकॉं. प्रितमकुमार पाटील, पोहेकॉं. यशवंत टहाकळे, पोकॉं. बबन पाटील व पोकॉं. प्रदीप सपकाळे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!