मोहर्रमनिमित्त सुन्नी ईदगाहवर वृक्षारोपण अभियान; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ..

0

जळगाव/प्रतिनिधी


जळगाव – पवित्र मोहर्रमच्या निमित्ताने आणि इस्लाम धर्मातील वृक्षारोपणाच्या (शजरकारी) महत्त्वाची जाणीव ठेवत आज जळगाव शहरातील नियाज अली नगर येथील सुन्नी ईदगाह मैदानावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.

अहले सुन्नत वल जमात, गुलामाने शोहदा ए करबला आणि गुलामाने अहेले बैत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली यांनी मोहर्रमचे महत्त्व आणि इस्लाम धर्मातील वृक्षसंवर्धनाच्या संकल्पना विषयी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी जबाबदारीने वृक्षारोपण करावे व त्यांचे संगोपन करावे. वृक्षतोड हे इस्लाम धर्मात निषिद्ध मानले गेले आहे.”

या प्रसंगी शंभर देशी कडू निंबाची झाडे लावण्यात आली. या उपक्रमात अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सय्यद अयाज अली नियाज अली, इकबाल वझीर, शेख जमील, नाझीम पेंटर, हाजी रशीद कुरेशी, शफी ठेकेदार, अजमल शाह, वाहेद खान, अब्दुल कादीर रानानी, हाजी सलीमुद्दिन, रऊफ खान, आसिफ अन्वर, छोटू पटेल, हाजी अशरफ, अफझल मनियार, शेख परवेझ, नूर खान, कामिल खान, अयान अलीम, वसीम खान यांचा समावेश होता.

शहरातील पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!