अँड. अमजद खान यांची नोटरी पब्लिक पदावर नियुक्ती..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अँड. अमजद खान यांची नोटरी पब्लिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारत सरकारच्या विधी व न्याय विभागामार्फत करण्यात आली असून, त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र नुकतेच सी.डी.पी. (दिल्ली), भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
अँड. अमजद खान यांच्या या उल्लेखनीय नियुक्तीमुळे अमळनेर शहरातील कायदा वकिल संघासह संपूर्ण जिल्ह्यातील विविध सामाजिक स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या यशामुळे अमळनेरच्या न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेत अधिक भर पडली आहे.