खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश – लोअर तापी प्रकल्पाला ₹८५९ कोटींच्या केंद्रीय मदतीसह मंजुरी..

0

आबिद शेख/अमळनेर


प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – त्वरित सिंचन लाभ कार्यक्रम (PMKSY-AIBP) अंतर्गत “लोअर तापी प्रकल्प, टप्पा-I, महाराष्ट्र” या महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून ₹८५९.२२ कोटींच्या आर्थिक सहाय्याची शिफारस करण्यात आली आहे. प्रकल्प गुंतवणूक मंडळाने (PIB) ही शिफारस काही महत्वपूर्ण अटींसह मंजूर केली आहे.

ही शिफारस मिळवण्यासाठी खासदार सौ. स्मिता वाघ यांनी केंद्रीय मुख्य सचिव (वित्त विभाग) श्री. वुमलूनमंग वुआलनम यांच्यासोबत चर्चा करत सक्रिय प्रयत्न केले. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी सिंचन सुविधांचा विस्तार होणार असून शेतीच्या उत्पादनक्षमतेतही वाढ होण्याची शक्यता आहे.

पीआयबीने घालून दिलेल्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे आहेत :

  1. प्रकल्प खर्चातील वाढीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल.
  2. भूमी अधिग्रहण तातडीने पूर्ण करण्यात यावे.
  3. जल संसाधन विभाग व संबंधित संस्था प्रकल्प वेळेत पूर्ण करतील.
  4. पाणी वापर शुल्क वसुलीसाठी यंत्रणा कार्यान्वित करावी.
  5. पाणी दर ठरवण्यासाठी स्पष्ट आणि व्यवहार्य धोरण तयार करावे.
  6. शेतकऱ्यांच्या पीक चक्राशी सुसंगत पीक विविधीकरणाला प्रोत्साहन द्यावे.
  7. प्रगती अहवाल पीआयबीकडे नियमित पाठवावेत.
  8. प्रकल्प कार्यक्षमतेसाठी उत्पादकता चाचणी राबवावी.
  9. लाभ-हानि खाते आणि बॅलन्स शीट तयार करावी.
  10. प्रकल्प अंमलबजावणी एकल नोडल एजन्सीद्वारे केली जाईल.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांना मोठी चालना मिळेल. विशेषतः खानदेशातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प वरदान ठरण्याची शक्यता असून, वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!