अमळनेररात जुनी पेन्शन विरोधात शासनाने काढलेल्या जीआरची केली होळी.

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील नगरपालिकेच्या ५०० कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत संताप व्यक्त करत तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय कचेरीजवळ येऊन पिपोसर्व संघटना मिळून आंदोलनकर्त्यांनी जुनी पेन्शन विरोधात शासनाने काढलेल्या जीआरची होळी केली. जुनी पेन्शनसाठी संपाची तीव्रता वाढण्यासाठी नगरपालिकेचे कर्मचारी संघटनांनी पालिकेपासून सुभाष चौक, तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा आला. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील होऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेत टीडीएफ संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षक भारàती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना, आरोग्य संघटना, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, ओबीसी शिक्षक संघटना , शिक्षकेतर कर्मचारी संघटना, ग्रंथपाल संघटना, आरोग्य संघटना, महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, कृषी विभाग सहायक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदरशन केलें या वेळी नगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.