निलिमा बागुल यांनी स्विकारला बस आगार व्यवस्थापक पदाचा पदभार..!

एरंडोल (प्रतिनिधि)येथील बसआगार व्यवस्थापक व्ही.एन.पाटील यांची जळगाव येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर जळगाव येथून बदली होऊन आलेल्या निलिमा बागुल यांनी १५मार्च२०२३ रोजी आगार व्यवस्थापक पदाच्या कामकाजाची सूञे स्विकारली.
यावेळी स्थानक प्रमुख गोविंद बागुल यांनी नवनियुक्त महीला अधिकारी श्रीमती बागुल यांचे स्वागत केले.
स्वच्छ प्रशासन तसेच प्रवाश्यांना दर्जेदार सेवा देऊन एरंडोल बसआगाराचे जास्तित जास्त नियते लावून एरंडोल बसआगाराच्या उतपन्नात वाढ करू अशी ग्वाही यावेळी निलिमा बागुल यांनी दिली.