पवित्र रमजान पर्व साठी विज,स्वच्छता, व सुरक्षेसाठी मुस्लिम शिष्ट मंडळाचे प्रशासनाकडे साकडे..

जळगाव ( प्रतिनिधि ) २३ मार्च पासून सुरू होणाऱ्या रमजान महिन्यासाठी प्रशासना कडे मुस्लिम शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन जळगाव जिल्ह्यासाठी विविध मागण्या सादर केल्या त्यात प्रामुख्याने
१) जिल्ह्यात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा या कालावधीत लोड शेडिंग करू नये व मोहल्ला मधील सर्व स्ट्रीट लाईट जे बंद आहे ते त्वरित सुरू करण्यात यावे
२) संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा व खास करून गटारीची स्वच्छता करून ती घाण त्वरित उचलण्याची व्यवस्था करण्यात यावी
३) जिल्ह्यात व शहरात खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक ती उपाय योजना करावी जेणे करून
रात्री वृद्ध व लहान मुलांना नमाज व रोजा इफ्तार साठी त्रास होणार नाही.
४) ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या वस्तीतील कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी
५) रमजान साठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी व काही ठिकाणी खास ईद बाजार भरवण्याची परवानगी देण्यात द्यावी
६) रमजान पर्व मध्ये जकात जमा करण्यासाठी महाराष्ट्रातून व महाराष्ट्र बाहेरील राज्यातील सफिर लोक (जकात जमा करणारे) शहरात व जिल्ह्यात वर्गणी जमा करण्यासाठी येत असतात त्यांचे पोशाखावरून त्यांच्यावर हल्ले होतात अशा काही विशिष्ट ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यात यावी.
७)रमजान पर्व व रमजान ईद शांततेत साजरी होण्यासाठी सराईत गुन्हेगार व खास करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे घटकांवर त्वरित प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी.
प्रशासनाच्या विविधी अधिकाऱ्यांना साकडे
सदरचे निवेदन माननीय अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,पोलीस अधीक्षक एस राजकुमार,अधीक्षक अभियंता तर्फे कार्यकारी अभियंता मानकर व आयुक्त जळगाव शहर मनपा यांना देण्यात आले.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
शिष्ट मंडळाचे मुख्य समन्वयक फारूक शेख,कुलजमाती अध्यक्ष सय्यद चाँद,राष्ट्रवादी चे प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार, एम आय एम जिल्हा अध्यक्ष अहमद शेख, शिवसेना बाळासाहेब ठाकरे महानगर अध्यक्ष जाकीर पठाण व मतीन सैयद, हुसेनी फाउंडेशन चे अध्यक्ष फिरोज शेख,ए यु फौंडेशन चे अध्यक्ष अन्वर खान,सिनेट सदस्य शब्बीर सैयद, नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, युवा मानियार बिरादरीचे मोहसीन युसूफ, वसीम शेख,अख्तर शेख, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींचा समावेश होता.
गा