महिलांसाठी चांगली बातमी प्रवासात ५० टक्के सवलत.

24 प्राईम न्यूज 17 मार्च 2023.उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR) निघाला असून शुक्रवारपासून (17 मार्च) एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे