धूम स्टाईलने सोनसाखळी चोरनारा अमळनेर पोलीसांच्या जाळ्यात…

0

अमळनेर ( प्रतिनिधि)२८/०३/२०२३ रोजी सांय.०७.३० वाजेच्या सुमारास सौ. वंदना गणेश पाटील रा. पटवारी कॉलनी, अभिषेक अपार्टमेंट भगवा चौक, अमळनेर महाराणा प्रताप चौका कडुन रेल्वे स्टेशन रोडाकडेस पायी चालत असतांना लोकसेवा झेरॉक्स समोरुन दोन अज्ञात इसम काळ्या रंगाचे मोटर सायकलने विरुध्द दिशेने येवुन मोटर सायकलवर मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील ०३ ग्रॅम वजानाचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन नेले म्हणुन अमळनेर पोलीस स्टेशन गु.र.न. १०२/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्यांतील आरोपीतांचा अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांचे मार्गदर्शनात शोध सुरु असतांना त्यांनी गुन्ह्यांतील फिर्यादी व साक्षीदार यांचे कडुन नमुद इसामांचे वर्णन समजुन घेतले व त्यावरुन अश्याप्रकारच्या गुन्हे करणारे कार्यपध्दती असलेल्या अमळनेर हद्दीतील व धुळे शहरातील गुन्हेगांराची माहीती संकलित करुन त्यांचे फोटो प्राप्त करण्याच्या सुचना तपास पथकांना दिल्या. त्यावरुन तपास पथकाने प्राप्त केलेल्या २० ते २५ गुन्हेगाराच्या माहीतीपैकी केवळ ०५ ते ०६ गुन्हेगार यांचे शाररीक वर्णन व गुन्हे कार्यपध्दती जुळुन आली व जुळुन आलेल्या ०५ ते ०६ गुन्हेगारांच्या मागील काही दिवसांच्या संशयित हालचालींची माहीती प्राप्त करण्या करीता गोपनिय सुत्राधार यांना कळविण्यात आले. त्यावरून अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चिमणपुरी पिंपळे बु. गावातील इसम नामे- शिवाजी निंबा चौधरी याच्यावर अधिक संशय बळावला व तपास पथकाने चिमणपुरी पिंपळे बु. गावात जावुन तपास केला असता तो वर नमुद गुन्हा घडल्याचे वेळेस अमळनेर शहरात त्याचे जोडीदार बाबत येवुन गेल्याचे समजल्याने त्यांनी गुन्हा केला असल्याची खात्री झाली. त्याअनुषंगाने नमुद इसमांस ताब्यात घेतले व त्यास विश्वासात घेवुन त्याच्या साथीदारा बाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्ह्यांत त्याचा धुळे येथील साथीदार नामे-सुनिल नारायण चौधरी याची माहीती दिली व त्यास देखील धुळे येथुन ताब्यात घेतले आहे. वरील दोन्ही आरोपी नामे- १) शिवाजी निंबा चौधरी रा. चिमणपुरी पिपळे बु. ता. अमळनेर २) सुनिल नारायण चौधरी रा. अलंकार सोसायटी, नटराज टाकी जवळ, धुळे अशायंनी गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांना गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतां कडुन अमळनेर पो.स्टे. कडील १) गु.र.न. ४२/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, २) गु.र.न. १०२/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४ प्रमाणे असे दोन मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीतांन कडुन गुन्ह्यांतील मुद्देमाल हस्तगत करणे, घटनास्थळाची पडताळणी करणे व इतर तपास सुरु असुन आरोपीतांकडुन अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. रामकुमार सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो., मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सो यांच्या वरीष्ठ पो.नि.श्री.विजय शिंदे यांच्या सुचनेप्रमाणे परी.पोउनि.विकास शिरोळे, सफौ/बापु साळुंके, पोना/मिलींद भामरे, पोना/सुर्यकांत साळुंखे, यांनी बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!