मणियार बिरादरी आणि वहेदत यांनी पाळधी येथील नुकसान ग्रस्त दुकानदारांना आर्थिक मदत तर गरजूंना रमजान किट वाटप..

कुलजमातीची पाळधी भेट- लोकांना घरी परतण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधि) शनिवार १,एप्रिल रोजी कुल जमातीचे शिष्टमंडळ मुफ्ती अतीकुर
रहमान शहर-ए-काजी यांच्या नेतृत्वात दंगल ग्रस्त पाळधी येथे भेट दिली असता त्यांच्या सोबत मुफ्ती हारून,सय्यद चाँद,डॉ.जावेद,अतिक अहमद,फारुख शेख,जमील देशपांडे,अनिस शाह,आरिफ देशमुख,मतीन पटेल,अख्तर शेख,मुजाहिद खान आणि मुख्तार शेख यांचा समावेश होता.

मोहल्ला आणि मशिदीत आवाहन
मोहल्लाआणि मशिदीत जाऊन कुल जमाती ने वडील धारी व भगिनींना आवाहन केले की त्यांनी आपल्या घरातील माणसांना आव्हान करावे की त्यांनी ताबडतोब आप आपल्या घरी परतावे आणि ज्यांची नावे एफआयआरमध्ये आहेत त्यांनीही पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे.भीतीने जगू नका.पोलिसांना मदत करा आणि तुम्हाला कशाची भीती वाटत असेल तर आमच्याशी संपर्क साधा असे नम्र आवाहन या शिष्टमंडळाने केले.
पोलीस अधिकाऱ्यांशी समन्वय
अमळनेर विभागाचे सहा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावल, पो नी धरणगाव,उद्धव डमाळे, सहा पो.निरीक्षक प्रमोद कठोरे व संतोष पवार यांची भेट घेतली व ज्या दुकानदारांचे नुकसान झाले त्यांची तक्रार लिहून द्यावी व ज्यांचा या दंगलीशी संबंध नाही अशा लोकांना त्रास होऊ नये,अशी मागणी करण्यात आली.
आर्थिक मदत आणि रमजान किट वाटप
जळगाव जिल्हा मणियार बिरादरीने ११ नुकसानग्रस्त दुकानदारांना ५०००/- रु

पये आणि वहिदत-ए-इस्लामी ने २०००/- रुपये असे ७०००/- रुपयांची मदत करण्यात आली. यासोबतच मणियार बिरादरीने १० गरजूंना संपूर्ण रमजान किट (१५०० रुपयांचे किराणा किट)सुध्दा देण्यात आले.
फोटो
१) महिलांशी चर्चा करताना मुफ्ती हारून,मुफ्ती अतिक व फारूक शेख सह अनवर खान दिसत आहे
२) मस्जिद मध्ये चर्चा करताना
३) पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शिष्टमंडळ
४) पोलीस दुरक्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळ