अमळनेर येथे शांतता समितीची बैठक संपन्न.

अमळनेर. (प्रतिनिधि) अमळनेर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शांतता कमिटी चि बैठक आयोजित करण्यात आली जळगाव जिल्हाचे पोलिस अधीक्षक एस.राजकुमार यांचा आदेशाने व अमळनेर विभागचे एस. पी. ऋषिकेश रावळ साहेब व अमळनेर चे पोलिस निरक्षक विजय शिंदे साहेब यांचा उपस्थित संपन्न झाली दोन समाजातील किरकोळ वाद निर्माण झाला होता त्या अनुषगाने ही मीटिंग बोलवण्यात आली
या वेळी पोलिस अधिकारी वेळीऋषिकेश रावळ साहेब यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना नागरिकांना सांगितले जर कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याची ग्य केली जाणार नाही. व कठोर कारवाई करण्यात येईल.खास करून तरुणांनी या गोष्टी पासून लांब रहावे जेणे करून आपले आयुष्य खराब होऊ नये.केसेस होतात नौकऱ्या नाहीत कॉम्पीटिशन प्रतेक शेत्रात आहे तरुणांनी आपल्या करियर वर लक्ष द्यावे .तसेच पोलिस निरक्षक विजय शिंदे साहेब व नगरपरिषद चे माजी नगर अध्यक्ष सुभाष अण्णा चौधरी.ऍड.शकील काझी,काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज पाटील , आरिफ भाया, यांनी ही आपल्या मनोगत व्यक्त करत शांततेचे आवाहन केले तसेच या वेळी अमळनेर शहरातील आजी-माजी नगरसेवक व समाजातील कार्यकर्ते, पत्रकार,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्र संचालन ज्येष्ठ पत्रकार राजु महाले सर यांनी केले.