अमळनेरात भगवान श्री महावीर जयंती उत्साहात साजरी…

0

अतिभव्य शोभयात्रेने संपूर्ण शहराचे वेधले लक्ष, समाजबांधवानी दिली 100 टक्के उपस्थिती

अमळनेर (प्रतिनिधि) येथील सकल जैन समाजातर्फे भगवान श्री महावीर जन्म कल्याण महोत्सव दिनांक चार 4 रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला,यावेळी काढण्यात आलेल्या अतिभव्य शोभयात्रेने संपुर्ण शहराचे

लक्ष वेधले होते,जैन समाजातील महिला व पुरुष बांधवानी 100 टक्के उपस्थिती दिली.
शोभा यात्रेची सुरुवात सराफ बाजारातील जैन मंदिरापासून करण्यात आली.शहरातील सर्व प्रमुख मार्गाने जात सुजाण मंगल कार्यालयात शोभयात्रेची सांगता करण्यात आली. शोभायात्रेत भगवान श्री महावीरांची पालखी तसेच पूज्य साधू आणि साध्वीजी म.सा. सोबत लहान मुले व पुरुष वर्ग सफेद वस्त्र व पगडी धारण करून सहभागी झाले होते.तर महिला आपापल्या मंडळाच्या साड्या परिधान करत भगवान श्री महावीरांची मूल्यवान संदेश ची पोस्टर्स हातात धरून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, मिरवणुकी दरम्यान आमदार अनिल भाईदास पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी,माजी आमदार श्रीमती स्मिताताई वाघ एडवोकेट ललिताताई पाटील तसेच पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व अन्य मान्यवरांनी जनकल्याणक निमित्त भेट देऊन समाजबांधवाना शुभेच्छा दिल्या.विविध मांगलिक कार्यक्रमही उत्साहात भगवान श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त दि 29 मार्च ते 4 एप्रिल पर्यन्त विविध मांगलिक कार्यक्रम देखील पार पडले.यात सब खेलो सब जातो,भगवान के जीवनपर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा,धार्मिक अंताक्षरी, रांगोळी स्पर्धा,जाहीर प्रवचन, धार्मिक नृत्य,संस्कारहीन जीवन नाटिका, संगीतमय शक्रस्तव अभिषेक, नवकार मंत्र जाप,विविध विषयांवर नाटिका आदी धार्मिक व मांगलिक कार्यक्रम पार पडले,व अखेरच्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली, सर्व समाज बांधवांनी सहभाग घेतला..

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!