अमळनेर येथे हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन..

अमळनेर(प्रतिनिधि) अमळनेर येथील नगरसेवक हाजी शेखा मिस्त्री, सामाजिक कार्यकर्ते राजू शेख अलाउद्दीन, सय्यद मुख्तार अली, साजिद शेख,यांच्या पुढाकाराने आयोजित हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी शिबिर नुकताच ग्रामीण रुग्णालयात संपन्न झाले. दरवर्षी मुस्लिम समाजातील भाविक पवित्र हज यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का मदिना येथे जातात, शासकीय रुग्णालयात जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालयात किंवा छावणीत होणे सक्तीचे असते एकूण, २६ हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरू भाविकांची ग्रामीण रुग्णालयात किमान दरात CBC, रक्तातील साखर, क्ष-किरण, KFT आणि ECG केले जातात. चार ते पाच वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ताडे, डॉ. संदीप जोशी इ. वैद्यकीय तपासणी शिबिरासाठी सहकार्य लाभले.