धार येथील दोन गावठी दारू अड्डयावर १३०० लिटर गावठी दारू जप्त मारवड पोलिसांचे छापे.

दोन जणावर गुन्हे दाखल
अमळनेर(प्रतिनिधी):-
अमळनेर तालुक्यातील धार येथे मारवड पोलिसांनी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे अडीच हजार रुपयांची ९० लिटर गावठी दारू मिळून आली असून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धार ता.अमळनेर येथे १३ एप्रिल रोजी प्लॉट भागातील संशयित प्रवीण काशिराम सैंदाने यांच्या घरासमोर १२०० रुपये किंमतीची ४० लिटर तर दुसरे संशयित संजय काशीराम सैंदाने यांच्या घरासमोर १४०० रुपये किंमतीची ५० लिटर गावठी हातभट्टी ची दारू मिळून आली.जागेवर पंचनामे करून दोघांविराधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोना मुकेश साळुंखे व सुनील तेली करत आहेत.