एरंडोल महाविद्यालयात मुलींना मोफत सायकल वाटप..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील दि.शं. पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज २१ एप्रिल रोजी शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत मुलींसाठी मोफत सायकलींचे संस्था अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत महाविद्यालयातील १४ लाभार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले
कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
ए.जे.पाटील, समन्वयक डॉ. अरविंद बडगुजर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस पाटील, परवेक्षक एन बी गायकवाड,
सायकल लाभार्थी विद्यार्थिनी, व विद्यार्थिनींचे पालक तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..