महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे विलास मोरे यांना पुरस्कार प्रदान..

एरंडोल ( प्रतिनिधि) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठावंत संस्थेचा उत्कृष्ट कादंबरी या सदरातील पुरस्कार काल दि २६ रोजी ” पांढऱ्या हत्ती काळे दात ” या विलास मोरे यांच्या कादंबरीला पुणे येथील एस एम जोशी, नानासाहेब गोरे अकादमीच्या सभागृहात प्रदान करण्यात आला . गौरव पत्र व रोख रकम असे पुरस्काराचे स्वरूप होते . दिल्ली येथील अंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक पद्मभूषण डॉ रामचंद्र गुहा , यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले . अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे सोबत म .सा .प. कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कुलगुरू डॉ . शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ . पी . डी . पाटील , कार्यवाह उद्धव कानाडे, सुनिता राजे भोसले व्यासपीठावर उपस्थित होते . खचाखच भरलेल्या सभागृहात ज्येष्ठ लेखक डॉ . राजा दीक्षित , खासदार श्रीनिवास पाटील, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ, रंगत संगत चे संस्थापक प्रमोद आडकर , कवी प्रकाश होळकर, साहित्यिक वि . दा . पिंगळे व पुणेकर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .