दत्त मंदिराच्या भराव पुलापासून बस स्थानकापर्यंत समांतर रस्त्यांची प्रतीक्षा संपेना.

एरंडोल (प्रतिनिधि) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात येथे दत्त मंदिराजवळ भराव पुल उभारण्यात आलेला आहे. या पुलापासून एरंडोल बस स्थानकापर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दोन्ही बाजूंना गटारींसह,समांतर रस्ते कधी होणार याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असल्यामुळे समांतर रस्त्यांचा प्रश्न सुटणारच नाही का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे शहरवासी व प्रवासी यांची सुरक्षितता समांतर रस्त्यान अभावी धोक्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे समांतर रस्ते नसल्यामुळे अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याचा संभव आहे त्यामुळे प्रवासी व नागरिकांची असुरक्षितता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरा नजीकच्या भराव फुलापासून एरंडोल बस स्थानकापर्यंतच्या जवळपास अर्धा किलोमीटर अंतराच्या महामार्गावर दोन्ही बाजूंना समांतर रस्ते होणे काळाची गरज आहे याशिवाय दोन्ही बाजूंना गटारी लाईट व इतर संसाधनांसह कामे होणे आवश्यक आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या पश्चिमेकडील नवीन वसाहतींमधील नागरिकांची रहदारीची समस्या विचारात घेणे ही गरजेचे होणार आहे तसेच नंदगाव रस्त्यालगत शेत शिवारात जाण्यासाठी एरंडोल येथील शेतकऱ्यांची रहदारीची समस्या सुटणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पिंपरी फाट्याजवळ जंक्शन होणे नितांत गरजेचे आहे. कारण त्या ठिकाणी पिंपरी रस्त्याला व एरंडोल शहराकडे जाणाऱ्या रस्त्याला उतार असल्यामुळे सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
समांतर रस्त्याच्या प्रश्नासाठी नागरिक आंदोलनाचा पवित्रा घेतील याची तर प्रशासनाला व नही संस्थेला प्रतीक्षा तर नाही ना…….