“शासन आपल्या दारी” या योजनेचा उपक्रम राबविण्यासाठी एरंडोल पंचायत समितीमध्ये बैठक..

एरंडोल (प्रतिनिधी)आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह, एरंडोल येथे “शासन आपल्या दारी” उपक्रम राबविणे बाबतचे नियोजन करणेकामी एरंडोल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी / विभाग प्रमुख यांची बैठक आयोजीत करण्यात आलेली होती.
सदर बैठकीमध्ये मा. उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग एरंडोल यांनी शासकीय योजना

लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासकीय योजनांशी निगडीत विविध दस्ताऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणेकामी नागरिकांनी विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांचेकडुन अर्ज भरुन घेणे या बाबतची कार्यवाही करणे बाबत सर्व संबंधितांना सुचना दिली. तहसिलदार, एरंडोल यांनी तहसिल कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सादर केली. तसेच तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी/ विभाग प्रमुख यांनी आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सादर केली. तसेच तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये जनकल्याण कक्षाची स्थापना करणेत आली असले बाबत नमूद केले.
आ. चिमणराव पाटील यांनी शेवटी बैठकीमध्ये सर्व उपस्थित शासकीय अधिकारी / विभागप्रमुख यांना सदर उपक्रमांतर्गत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ देणे बाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे बाबत निर्देश दिले.