स्व.सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्य. विदयालयाचा निकाल 100 टक्के..

अमळनेर (प्रतिनिधि) .02/06/2023 रोजी माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर झाला असून यात आपल्या स्व सौ पद्ममावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्याल्याचा

100/ निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या वर्षी विद्यालयातून कु.वासुदेव दिलीप पाटील 89.60 (प्रथम) कु.ओम युवराज पाटील 87.20/ (व्दितीय) कु.भाग्यश्री माळी 86.00/ (तृतीय) कु.मोहिनी मनोज पाटील 85.40/ (चतृर्थ ) गुण प्राप्त करुन यश संपादन केले. यांच्या यशाबद्दल सर्वांकडून कौतुक होत आहे.
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री.प्रकाशभाऊ मुंदडा,सचिव श्री.नरेंद्रभाऊ मुंदडा, सहसचिव श्री. योगेश भाऊ मुंदडा तसेच मुख्याध्यापक,सर्व शिक्षक & शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.