लोकमान्य विद्यालयाचे घवघवीत यश!

अमळनेर ( प्रतिनिधि ) अमळनेर मार्च 2023 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेच्या रिजल्ट नुकताच जाहीर झाला. लोकमान्य विद्यालयातून प्रथम कु.प्रणाली प्रवीण महाजन शे.९५% गुण मिळविले तर द्वितीय चि.शिवम जय किसान भावसार शे.९४.४०% गुण

मिळविले, कु.तृतीय प्रज्ञा मधुकर सोनार शे.९३.२०% गुण तर कु.वैष्णवी अरुण महाजन शे.९२.२०% गुण व चि. सुमित राजेंद्र महाजन यास शे.९१.२०% गुण प्राप्त झाले. विद्यालयाच्या एकूण निकाल ८९.४१% लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे लो.शि मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.अरविंद फुलपगारे, चिटणीस विवेकानंद भांडारकर, लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी, मुख्याध्यापक रविंद्र लष्करे, ज्येष्ठ शिक्षक मनोहर महाजन व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.