प्रशासकीय इमारतीला प्रशासनाकडूनच अडथळे, आमदार अनिल पाटील यानी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा दिला इशारा. -महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम

अमळनेर ( प्रतिनिधि )येथील प्रशासकीय इमारतीसाठी आता सामान्य नागरिक देखील सरसावले असून त्यासाठी महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
जनतेला सोयीस्कर ठरणाऱ्या प्रशासकीय इमारतीला प्रशासनाकडूनच अडथळे येत आहेत. मुदतीत काम न झाल्यास निधी परत जातो

अथवा अडथळे येऊन कामच रखडते. पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही पोलीस विभाग जागा खाली करत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रशासनने मार्ग काढून इमारतीचे काम त्वरित सुरू करावे म्हणून आमदार अनिल पाटील यांनी नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
त्यांच्या मदतीला आता कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील सरसावले असून त्यासाठी स्वाक्षरी मोहीमच राबवण्यात आली. महाराणा प्रताप चौकात जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, माजी जिप सदस्या जयश्री पाटील, जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष उमाकांत नाईक, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, माजी नगरसेवक विवेक पाटील, विनोद कदम, एस बी बैसाणे, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे, शहराध्यक्ष अलका पवार, प्रा अशोक पवार, रणजित पाटील, सचिन बेहरे, गणेश भामरे, मुशीर शेख, बाळू पाटील, निलेश देशमुख, सुनील शिंपी, भूषण भदाणे, उमेश सोनार, प्रदीप पाटील, निनाद शिसोदे, भूषण पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला व प्रशासकीय इमारतीसाठी आम्ही देखील आमदारांसोबत असल्याचे बोलून दाखवले.
शिवसेनेचाही पाठिंबा …!
प्रशासकीय इमारत व महसूल इमारत जुन्या पोलीस मैदानावर होणार असल्याने सामान्य जनतेची खूप मोठी अडचण दूर होणार आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी शिवसेना (उबाठा) भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी असून धरणे आंदोलन सह इमारतीच्या प्रत्येक आंदोलनात शिवसेना असंख्य कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभागी होईल असे तालुका प्रमुख श्रीकांत पाटील यांनी कळविले आहे.