अमळनेरात आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा होणार गौरव..

अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी ढेकु रोडवरील फोर्ट या ठिकाणी सायंकाळी ०५:३० वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.सुरुवातीला धरणगाव येथील डी.ए.पाटील यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर प. पू.विद्या दीदी, सारिका बेन रवींद्र पाटील, शगुप्ता बानो समद बागबान,स्नेहा एकतारे, सुलोचना पाटील, मिनाबाई पाटील, जयश्री साबे,रूपाली राजपूत, सुचित्रा रत्नपारखी, मनीषा पाटील,विद्या लांडगे, ललिता पालवे,अनिता मोरे, प्रज्ञा हडपे,ज्योती पाटील, कविता आढावे, सुवर्णा पाटील,मेघा कंखरे, भारती पाटील,विद्या चौधरी, दिपाली शिरसाठ, सुषमा बोरसे यांचा सत्कार होणारा आहे.या वर्षी अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समितीचे प्रमुख डॉ. अविनाश जोशी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत. प्रमुख पाहुणे माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील,माजी आमदार स्मिता वाघ, जि.प.सदस्या जयश्री पाटील,खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, माजी नगराध्यक्ष पुष्पलता पाटील,नगरसेवक श्याम पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.सर्व अमळनेरवासयांनी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे असे मौर्य क्रांती संघ सकल धनगर समाजाच्या वतीने
बन्सीलाल भागवत,गोपीचंद शिरसाठ,ज्ञानेश्वर कंखरे,एस. सी.तेले,प्रभाकर लांडगे,डी.ए. धनगर,रमेशदेव शिरसाठ, हरचंद लांडगे,समाधान धनगर, देवा लांडगे,नितीन निळे,दिलीप ठाकरे, प्रदीप कंखरे,गोपाल हाडपे, प्रा.गजानन धनगर,प्रा.मनोज रत्नपारखी,जयप्रकाश लांडगे, शशिकांत आढावे, भावलाल पाटील,तुषार इधे, आदेश धनगर, उमेश मनोरे आदिनी कळविले आहे..