आरोपी मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी – अप्पर पोलीस महासंचालक यांचे नाशिक सीआयडी ला आदेश…

जळगाव ( प्रतिनिधि) अंमळनेर दंगलीतील न्यायालयीन कोठडी असलेले आरोपी अशपाक शेख सलीम यांच्या मृत्यूप्रकरणी जळगाव

जिल्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे सीआयडी चौकशीसह पोलीस निरीक्षक व पोलीस सहकारी यांच्या निलंबनाची मागणी केली होती त्या धरतीवर व पोलीस अधीक्षक जळगाव यांनी दिनांक १५ जून ला वारिष्टना पत्र पाठवून माहिती दिल्यावरून अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांनी १५ जून च्या संध्याकाळी या मृत्यू प्रकरणाची चौकशी सी आय डी मार्फत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक यांना दिले आहे.
सदर प्रकरणी नाशिक सी आय डी ने पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या कडील आरोपींचे इनकवेस्ट पंचनामा, पोस्टमार्टम रिपोर्ट व इतर सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात करावी व सदरचा तपास हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे तसेच पोलीस महासंचालक यांचे १५ डिसेंबर २००५ व १७ ऑगस्ट २०२२ अन्वये दिलेल्या सूचनांचे अंमलबजावणी करून पूर्तता करावी असे आदेश दिलेले आहे.
आंदोलन कर्त्यांना दिलासा
१५ जून रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक एस राजकुमार यांना जळगाव व अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जे साकडे घातले होते. पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी जे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता ७ ते ८ तासात झाल्याने आंदोलन कर्त्यांना फार मोठा दिलासा मिळाला असून मृत अश्फाक शेख यांचे कुटुंबीयांनी सुद्धा समाधान व्यक्त केल्याचे फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मानियार बिरादारीने यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.