नाशिक बालकल्याण समिती मधून ती ३० मुले घराकडे रवाना..

जळगाव व भुसावळ करांनी दिली स्नेहाची शिदोरी
जळगाव ( प्रतिनिधि)३० मे रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनला २९ मुलं व मनमाड रेल्वे स्टेशनला ३० मुले आर पी एफ नी उतरवून जीआरपीच्या स्वाधीन केली होती. जीआरपी ने भुसावळला एक मौलाना तर मनमाडच्या जीआरपीने चार मौलानाविरुद्ध कथित तस्करी प्रकरण नोंदविले होते. या मुलांची रवानगी बालकल्याण समिती जळगाव व नाशिक येथे करण्यात आली होती.
१३ जून रोजी जळगाव येथील २९ बालकांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या गावी पाठवण्यात आले होते.
आज १६ जून रोजी नाशिक

येथील ३० मुले गोहाती एक्सप्रेस ने रवाना भागल पूर साठी रवाना करण्यात आली.
या कार्यकर्त्यांनी दिला निरोप
जळगाव जिल्हा मानियार बिराजदरीचे अध्यक्ष फारूक शेख,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष मझहर खान, इदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शाह, भुसावळचे इम्तियाज शेख,नदीम बागवान, नदीम शेख, साजिद शेख, आदींचा समावेश होता
जळगावकरांनी मुलांना दिला निरोप व स्नेहाची शिदोरी
भुसावल रेल्वे स्थानकावर गोहती एक्सप्रेस ने जाणाऱ्या या ३० बालकांना जळगाव व भुसावळ येथील सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी त्यांना स्नेहाच्या शिदोरीसह पाणी व थंड पेय दिले.