फातेमा उर्दू हायस्कूल येथे शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा..

धुळे, (अनिस अहेमद) दिनांक 15 जून 2023 गुरुवार रोजी अल फातेमा उर्दू हायस्कूल, रहमत नगर धुळे. येथे शाळेचा पहिला दिवस उस्पुर्त पणे साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा व वर्ग खोल्यांना शुशोभीत आले. सर्वप्रथम शाळेच्या परिसरात

त भव्य रॅली काढण्यात आली यात विद्यार्थ्यांनी घोषवाक्य ‘कहा चले हम कहा चले हम’ – ‘स्कूल चले हम स्कूल चले हम’ या वाक्याने परिसर दम दमून काढला. सोबत संगीत वाद्यांमुळे आणखी या रॅलीची शोभा वाढवण्यात आली, यानंतर शाळेच्या पटांगणात मोफत पाठ्यपुस्तकाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे उत्साह भरभरून दिसून येत होते. संस्थेचे अध्यक्ष लतीफ देशमुख सर साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व पुस्तक वाटप करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची शुभेच्छा देण्यात आली. तसेच इयत्ता दहावीत प्रथम (खुशनुमा जाकीर शेख 81.60% ) द्वितीय *(मिर्झा आमेना अकिल बेग 81.40% ) आलेल्या विद्यार्थांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गुणगौरविण्यात आले. सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव आकिब देशमुख सर साहेब तसेच आरिफ देशमुख सर साहेब शाळेच्या मुख्याध्यापिका तय्यबा कुरेशी मॅडम नाजनीन अन्सारी मॅडम व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते, सूत्रसंचालन मोहम्मद रमजान सर यांनी केले शेवटी विद्यार्थ्यांना मिष्टांन वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.