शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये कॅम्पस प्लेसमेंट

एरंडोल ( प्रतिनिधी ) पळासदळ, एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मधील प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह च्या माध्यमातून महाविद्यालयातील पात्र 63 विद्यार्थ्यांंना नौकरीची संधी देण्यात आली होती. भारतातील नावाजलेल्या कंपनी Fagship Biotech Ltd. आणि Technovision Pvt. Ltd. यांनी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी च्या डी . फार्म व बी. फार्म च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांंना ही संधी देण्यात आली होती, त्यापैकी 05 विदयार्थ्यांची निवड Fagship Biotech Ltd. आणि 10 विद्यार्थ्यांची निवड Technovision Pvt. Ltd मध्ये झाली. कंपनी चे संचालक श्री. नितीन पाटील यांनी निवड प्रक्रिया पूर्ण केली. तदपूर्वी श्री. नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शास्त्री फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव सौ. रूपा शास्त्री यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व कोऑर्डिनेटर प्रा. सुनील पाटील व प्रा. सुमेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले असे PRO श्री. शेखर बुंदेले यांनी कळविले.