अमळनेर येथील मिल कंपाऊंड येथे चोरटे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार.

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर शहरातील प्रताप मिल कंपाउंड भागातील असणाऱ्या एका घराचा कडी कोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले घटना २० रोजी रात्री घडली. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिरारी यांच्या घरी दि. २० रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजा टॉमीच्या साहाय्याने कडी कोंडा तोडून घरातील कपाटात असणाऱ्या सुमारे १७ ग्रॅम वजनाचे ४२ हजार ५०० रुपये किंमत असलेली मंगल पोत, व चार ग्रॅम वजनाची १० हजार रुपये किंमत असलेले सोन्याचे कानातील कर्णफुले व खिशातील नऊ हजार रुपये रोख असा ६१ हजार ५०० शहरातील प्रताप मिल कंपाउंड रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची परिसरात राहणाऱ्या कैलास शांताराम घटना घडली परिसरातील नागरिकांनी रात्रीचं गस्ती वाढविण्याची मागणी केली.