शहराच्या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्नांना वेळीच हाणून पाडणे व धर्माध समाजकंटकावर सक्त कारवाई होणेबाबत. जमियत उल्लिमा धुळे तर्फे निवेदन..

धुळे (अनिस खाटीक)
धुळे शहर अतिश्य संवेदनशील शहर असुन सन २००८, २०१३ च्या धार्मिक दंगलीमुळे शहराचे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक व जिवीत हानीला तोंड द्यावे लागले होते. मागील दोन महिन्यात विविध घटनांपासुन काही धर्मांध, आराजक निर्माण करु
पाहणारे समाजकंटक शहराच्या शांततेला तडा देण्याचे प्रयत्न करीत आहे.
१. निजामपुर जैताणे येथील पोलीस कर्मचारीच्या व्यक्तीक वाद.
२. नेर गावात मशिदीची विटंबना.
३. मोगलाई येथील मंदिराची विटंबना.
४. लळींग घाटात वारंवार मुस्लिम समुदायाच्या व्यक्तींवर होत असलेले हल्ले
५. वाढते व्यसन, नशेच्या औषधांची सर्रास विक्री
महोदय, उपरोक्त घटनांपैकी निजामपुर येथील घटना व्यक्तीक स्वरुपाची असुन देखील काही धर्मांध समाजकंटकांनी सोशल मिडीयावर त्या घटनेला धर्मीक वळण देणयाचे नापाक प्रयत्न करुन जिल्हयाची शांतता, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे पोलीस अधिक्षक साहेबांना बाईट देणे भाग झाले होते. परंतु संबंधितावर कठोर कारवाई न झाल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचे दिसुन येते.
त्यानंतर पुन्हा जिल्हयात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे गैरहेतु काही धर्माध समाजकंटकांनी नेर गावातील मशिदीची विटंबना केली. परंतु मुस्लिम समुदायाच्या संयम व पोलीस दलामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.त्यानंतर लागोपाठ मोगलाई येथील मंदिराची मुर्तींची विटंबना करण्यात आली. त्याचा आधार घेवून काही धर्माध समाजकंटक जे शहरात दंगल घडवु पाहत आहेत, त्यांनी सदर घटनेशी मुस्लिमांना जोडुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्यात मुस्लिमेतर व्यक्ती मिळुन आल्याने शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहीली. परंतु अशा घटनेचा आधार घेवुन धार्मिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई न झाल्यामुळे संभ्रम निमार्ण होत आहे.
महोदय, शहरात नेशेच्या प्रतिबंधीत औषधी/दारुची सर्रास खरेदी विक्री सुरु असून युवकांमध्ये नशेचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलेले आहेत. यावर कारवाई होत नसल्याने युवा पिढी नशेच्या जाळयात अडकुन अवैध कामात व्यस्त झाले आहेत. त्यांच्यामुळे सामान्य कायदाप्रिय नगरीकांना मोठया प्रमाणात अडचणी व भयाला तोंड द्यावे लागत आहे. नशेमूळे यापूर्वी धार्मिक स्थळांची विटंबनाचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे नशेडी लोकांमुळे शहराला गालबोट लागून शांतात व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. म्हणून सदर बकायदेशीर नशेच्या औषधी विक्रीवर तसेच विवधि घटनांना धार्मिक रुप देवून शांतात बिघडुन दंगल घडवु पाहणारे समाजकंटकावर त्वरीत ठोस कारवाई होणे गरजेचे आहे.
तसेच मागील काही महिन्यापासून धुळे मालेगांव रसत्यावर लळींग घाटात अल्पसंख्यक समुदायाला टार्गेट करुन मारहाण व लुटमार केल्याचे प्रकारे नित्याचेच झालेले आहेत. परंतु त्यांचवर देखील ठोस कारवाई व गुन्हे दाखल न झाल्याने समाजकंटांना अभय मिळत आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्यक समुदाच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. म्हणून अपराधी प्रवृत्तीच्या लोकांवर देखील त्वरीत गुन्हे दाखल करुन अल्पसंख्यक समाजाला न्याय मिळणे अपेक्षित व गरजेचे आहे.