आषाढी एकादशीनिमित्त भालगांव बु येथे विविध कार्यक्रम..

एरंडोल ( प्रतिनिधि)
एरंडोल तालुक्यातील भालगांव बु येथील श्री विठ्ठलरुक्मणी मंदिर संस्थानच्यावतीने गुरुवारी (ता. २९) आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. प्रति जाणाऱ्या या देवस्थानात सुमारे २२ वर्षापासून एकादशीनिमित्त भव्य यात्रा भरत असते. दरवर्षी परिसरातील दहा ते पंधरा गावातील पायी वारी एकादशीनिमित्त येत असतात. हजारो भाविक भालगांव येथे येऊन मुतीचे दर्शन घेत असतात. गुरुवारी सकाळी पाचला महापूजा होणार असून, आठ वाजे पासून दिवसभर भजन व प्रवचन होईल. महालातून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना सामाजिक कार्यकर्ते मनोज मराठे यांच्यातर्फे फराळ वाटप करण्यात येणार आहे. रात्री नऊला सी. एच. पाटील महाराज यांचे कीर्तन होणार आहे. संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष देविदास मराठे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, एकादशीनिमित्त भालगांव येथे यात्रा भरत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व लहान बालके यात्रेचा मनमुराद आनंद घेत असतात. यात्रेत विविध खेळण्यांची दुकाने लावली जात असल्यामुळे मुले खेळण्याची खरेदी करतात तर महिला जीवनावश्यक वस्तूची खरेदी करीत असतात