अजून एकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू- चौकशीची मागणी

जळगाव ( प्रतिनिधि )
तळवेल येथील शरीफ पिंजारी यांचा संशयास्पद मृत्यू
जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थातच शासकीय महाविद्यालयात २९ जून गुरुवारी तळवेल येथील रहिवासी शरीफ आलम पिंजारी वय ३० याचे वैद्यकीय उपचार सुरू असताना मृत्यू झाले. पिंजारी हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला असल्याने त्याची चौकशी होऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी एक मुखी मागणी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, जळगाव जिल्हा पिंजारी समाज अध्यक्ष अख्तर पिंजारी, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, मलिक फाउंडेशन चे नदीम मलिक, ईदगाह ट्रस्ट व शहा बिरादरीचे अनिस शाह,रोशन पिंजारी,हारून,रशीद,शरीफ,इब्राहिम,रफिक,निसार व अफजल पिंजारी, अनिस शब्बीर, सईद शेख,अकिल शेख, भुसावळचे रशीद पिंजारी आदींनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन जळगाव येथे तक्रार करून केलेली आहे.
सदरची तक्रार जिल्हा सामान्य रुग्णालयातच एलसीबी चे पी आय किसन पाटील, जिल्हा पेठ पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना देण्यात आली.
तक्रारीचा सारांश
दिनांक २३जून रोजी तळवेल येथे नेहरू विद्यामंदिर मधील पाण्याची मोटार चोरल्याचा आरोप शरीफ आलम यांच्यावर करण्यात आला होता व त्याला त्या ठिकाणी लोकांनी मारहाण केली होती, सदर मोटर दुसऱ्या दोन व्यक्तींनी मुलींच्या शाळेतून काढून आणून पोलिसांना त्याच वेळी दिली होती परंतु वरणगाव पोलिसांनी फक्त शरीफ आलम यांच्या विरोधात भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक केली होती. २४ जून रोजी न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. न्यायालयीन कोठडीत भुसावळ कारागृहात असताना त्याला त्रास झाल्याने कारागृह अधीक्षकांनी त्याची रवानगी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे केली होती व तशी नोंद वरणगाव पोलीस स्टेशनला कळवली होती.
२५ जून रोजी शरीफ आलम च्या चुलत भावाला पोलीस कॉन्स्टेबल देविदास कमलाकर यांनी फोनवरून कळविले होते की तुमच्या भावाची प्रकृती खराब असल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात ऍडमिट केले आहे आपण जाऊन बघा.
त्याप्रमाणे मृताचे काका व वडील यांनी कैदी वार्डात
भेट घेतली होती.
दिनांक २६ जून रोजी कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन कैदी वार्डात चौकशी केली असता त्याचा
जामीन झाला असल्यामुळे त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केलेले आहे असे कळले.
दि २७ व २८ जून रोजी पेशंट बेशुद्ध होता व २९ जून रोजी तो मरण पावला ही हकीकत आहे.
चौकशी खालील मुद्द्यावर करण्यात यावी एकमुखी मागणी
१) शरीफ आलाम ला मारहाण करणारे कोण? त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार का दाखल केली गेली नाही?
२)गुन्हा रजिस्टर क्रमांक १२८ – २३ यामध्ये शरीफ आलम याला एकट्याला का अटक करण्यात आली त्याचे दोन साथीदार यांना का सोडण्यात आले?
३) चोरीची मोटर सापडून सुद्धा त्याला अटक का करण्यात आली ?
४)अटक केल्यानंतर घरच्या कुटुंबियांना का कळवले नाही?
५) भुसावळ कारागृहात असताना त्याचा परस्पर जामीन कोणी घेतला?
६) पर्सनल बॉंड चे पैसे कोणी भरले ?
७)भुसावळ कारागृहात त्याच्या डोक्याला मार कशामुळे लागला ?
८)त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय तपासणी झाली होती का?
९)दिनांक २३ जून लोकांनी केलेली मारहाण,२४ जून ची न्यायालयीन कोठडी, भुसावळ कारागृहात डोक्याला मार, दिनांक २५ ते २९ जून सामान्य रुग्णालयातील कैदी वार्ड ते आयसीयू वार्ड मध्ये झालेला उपचार या सर्व बाबींचा उलगडा व्हावा म्हणून या प्रकरणी सविस्तर चौकशी होऊन जो कोणी याच्या मृत्यूस जबाबदार असेल त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
शुक्रवारी होणार पोस्टमार्टम
गुरुवारी दुपारी ही तक्रार दिल्यावर या मृताचा पोस्टमार्टम शुक्रवारी तज्ञ डॉक्टरांच्या समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर परेश जैन यांनी मुस्लिम शिष्टमंडळाला माहिती दिली.