अमळनेर येथे पाऊसामुळे बकरी ईद ची नमाज मस्जिदीत अदा,,,,

अमळनेर (प्रतिनिधि )
अमळनेर शहरात २९ जून गुरुवार रोजी ईद उल अज़हा ( बकरी ईद ) ची नमाज इदगाह मैदानावर सकाळी ७:३० वाजेची वेळ ठेवण्यात आली होती परंतु रात्रि पासुन सतत पाऊस सुरू असल्याने शहर इदगाह मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने निर्णय घेण्यात आला शहरातील सर्व मस्जिदीत बकरी ईद ची नमाज अदा करण्यात आली
शहरातील विविध मस्जिदीत पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतरावर ईद ची नमाज पठण करण्यात आली शेवटची नमाज ८: ३० वाजता जामा मस्जिद कसाली मोहल्ला येथे संपन्न झाली नमाज पठण नंतर सर्व बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच आषाढी एकादशी निमित्त कोणीही कुर्बानी केली नाही ,संपूर्ण शहरात शांततेत ईद व आषाढी दोन्ही सण उत्सवात साजरा करण्यात आला