अवघी दुमदुमली अमळनेर प्रतीपंढरपूर नगरी… -वाडी संस्थानात हजारो भाविकांनी घेतले विठू माऊलीचे दर्शन

अमळनेर ( प्रतिनिधि )
अमळनेर-आषाढी निमित्त विठूरायच्या दर्शनासाठी पंढरपूरात पोहचू न शकलेल्या अमळनेर तालुक्यासह बाहेर तालुक्यातील हजारो भाविकांनी काल प्रतीपंढरपूर संबोधल्या जाणाऱ्या अमळनेर येथील वाडी संस्थानात जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेतले.
सकाळी पाऊस असताना देखील भाविक वाडी संस्थानात दाखल झाल्याने दर्शनासाठी सकाळ पासूनच रांगा लागल्या होत्या, गर्दीमुळे संपुर्ण परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते,येथे अनेक दुकाने ही थाटली होती,आषाढी च्या एक दिवस आधी शहरातील अनेक शाळेतील बाल वारकऱ्यांच्या दिंड्या वाडीत दाखल झाल्याने दोन दिवसांपासून परिसरास पंढरपूरचेच स्वरूप प्राप्त झाले होते,भाविकांनी वाडी मंदिरात विठू रुखमाई चे तर बोरी पात्रातील संत सखाराम महाराज समाधी स्थळाचेही दर्शन घेतले.