शरीफ आलम पिंजारी, (कैद्याचा )फॉरेन्सिक तज्ञाद्वारे पोस्टमार्टम..

जळगाव (प्रतिनिधि)
मृत्यूचे कारण राखीव
सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना न्यायबंदी शरीफ आलम पिंजारी यांचा
गुरुवारी २९ जून रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. नातेवाईकांनी व सामाजिक संघटनांच्या तक्रारीवरून त्या कैद्याचा पोस्टमार्टम ३० जून रोजी सकाळी ११ ते १२.३० वाजेपर्यंत फॉरेन्सिक लॅब तज्ञ डॉक्टर वैभव सोनार व डॉक्टरची जितीन शाह यांनी केला असून मृत्यूचे कारण मध्ये त्यांनी त्यांचे निष्कर्ष राखीव ठेवले असून विसेरा हा जप्त केला आहे. त्याचा केमिकल रिपोर्ट व हिस्टो पॅथॉलॉजी रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे कारण देता येईल असे प्रोविजनल पोस्टमार्टम रिपोर्ट द्वारे म्हटलेले आहे. वरणगाव पोलिसांना मारणाऱ्यांची ची दिले नावे
सामान्य रुग्णालयात आज वरणगाव पोलीस स्टेशनचे चोरी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याचे आय ओ यांना मयताचे वडील व काका यांनी मयताला मारहाण करणारे किशोर हरी भारंबे, गजानन पुंजू राणे, किशोर काशिनाथ कोळी, सोपान तुकाराम पाटील, मयूर किसन पाटील व इतर तीन चार लोक ज्यांची नावे त्यांना माहित नाही अशा लोकांनी मयताला २३ जून रोजी अमानुष पणे मारहाण केली असल्याचे तोंडी तक्रार दिली.
मणियार बिरादरीची वरिष्ठांना तक्रार सादर
दिनांक २९ जून रोजी मयताचे काका शरीफ आलम पिंजारी यांनी पाच पानी तक्रार दिली असून त्या तक्रारीची चौकशी त्वरित करण्यात यावी व त्वरित संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस अधीक्षक जळगाव, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई, गृहमंत्री व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आल्याचे बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे?