अमळनेरचा संदीप संदानशिव झळकणार
नवीन प्रदर्शित होणारा “करम” या अलबम मध्ये..

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर शहरातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील संदीप संजीव संदानशिव यांने मुंबई सारख्या माया नगरीत अथांग संघर्ष करून आपली मेहनतीची छाप

सोडली आहे..तस गेल्या तब्बल सहा वर्षापासून त्याचा हा संघर्ष सुरू होता, पण आज खऱ्या अर्थाने त्यांच्या मेहनतीला यश आले.अतिशय साध्या कुटुंबातील संदीप त्यांचे वडील श्री. संजीव धर्मा संदानशिव अर्बन बँक मध्ये वसुली अधिकारी म्हणून कार्य करत होते. पण आता ते 2021 मध्ये ते सेवा निवृत्त झाले व आई संगीता संदानशिव गृहणी असून अतिशय साधी राहणीमान व लहान भाऊ MBBS Dr. शुभम संदानशिव सद्या मेडिकल ऑफिसर म्हणून अमळगाव इथे कार्यरत आहे..
रॅपर म्हणून जगभरात गाजत असलेले सिधेमौत आणि DJ काश्मीर यांचा नवीन अलबम “करम” हा प्रदर्शित होणार आहे व त्यातलं पाहिलं व्हिडीओ गाणं “Bhussi” हे येत्या 6 जुलैला जगभरात प्रदर्शित होणार आहे,त्यात त्याची प्रमुख भूमिका असणार आहे..
तरी सर्वांची उत्सुकता वाढली असून लवकरच आपल्या भेटीला हे व्हिडीओ गाणं येत आहे,
जगभरात गाणं प्रदर्शित होतांना मागचा संघर्ष त्याला डोळ्यांसमोर उभा राहतो. बऱ्याच वेळेला चित्रपट असतील मोठे शो असतील त्यात त्याचं काम शेवटच्या घडीला हातातून निसटून जायची आणि हतबल झाल्यासारखं वाटायचं पण सहा वर्षानंतर या यशाने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.