महिला अत्याचाराबद्दल सरकार गंभीर नाही – सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 1Jul महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळ्या मुली- तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबद्दल हे सरकार गंभीर नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मुंबईत धावत्या रेल्वेत विनयभंगाची घटना घडली आहे. हा अतिश संतापजनक प्रकार आहे. याला गृहखात्याची उदासीनता कारणीभूत ठरली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.