विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश!

0

एरंडोल ( प्रतिनिधि) पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव सी बी एस ई अभ्यासक्रमातून दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. प्रगत विचार व सांस्कृतिक मुल्यांची जोपासना करीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवीत संस्था वाटचाल करीत आहे.

शैक्षणिक मार्गदर्शन, खेळ, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी ,नेतृत्व गुण विकास ई. वर भर दिला जातो.याचा परिणाम स्वरूप पोदार स्कूलचे विद्यार्थी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ऑलिम्पियाड परीक्षेतपोदार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन केले आहे. नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पोदार स्कूलचा ई.२ री चा विद्यार्थी वेद ज्ञानेश पाटील याने आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक ,प्रमाणपत्र तसेच रु.१००० चे रोख पारितोषिक तसेच इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेतही रु.५०० चे रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले.

कु.गिरीश हरी चौधरी (ई.१ ली) यानेही इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत रु.५०० चे रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले तर अविनाश अभिजित नगले हा (ई.२ री ) आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक ,प्रमाणपत्र व रु.१००० चे रोख पारितोषिकाचा मानकरी ठरला.अनुभूती रंजन महाजन हिने देखील या परीक्षेत रु.५०० चे रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले.

ई.१० चा माजीद हुसैन रौप्य पदकासह रोख रु.२५०० व प्राविण्य प्रमाणपत्र पटकावले तर वीर शहा ई.७ वी नॅशनल सायबर ऑलिम्पियाड परीक्षेत रु.५०० चे रोख पारितोषिक व गुणवत्ता प्रमाणपत्राचा मानकरी ठरला.

पोदार स्कूलचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ठ यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोदार स्कूलचे उपप्राचार्य श्री दीपक भावसार, पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!