मराठा समाजातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन..

0

अमळनेर (प्रतिनिधि)

अमळनेर तालुक्यातील विविध सहकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मराठा समाज तर्फे ३ जुलै रोजी मराठा मंगल कार्यलयात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती , खान्देश शिक्षण मंडळ व अर्बन बँक आदी संस्थांमध्ये निवडून आलेल्या चेअरमन ,व्हॉ चेअरमन व सर्व संचालकांचा व उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून पुरस्कार मिळवणारा अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांचा सत्कार ३ रोजी दुपारी १ वाजता आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील , माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार डॉ बी एस पाटील ,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील , प्रा लीलाधर पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील व समाजातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!