अमळनेरचे आ. अनिल पाटलांनी घेतली मंत्रीपदाची शपथ !

अमळनेर (प्रतिनिधि) महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे.दि. 2 जुलै 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात थेट विरोधी पक्षनेते पदावरून अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचे शपथ घेतली. त्यांच्यासोबत तब्बल राष्ट्रवादीचे नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीतील 29 आमदार हे पक्ष सोडून निघाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सुद्धा आज राजभवनात मंत्री पदाची शपथ घेतली.आज राजभवनात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांसोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम,आदिती तटकरे,संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या सर्वांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.