खान्देशातून एकमेव आम.अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद अमळनेरात कार्यकर्त्यांचा जल्लोष.

0

अमळनेर (प्रतिनिधि)
राज्याच्या सत्तास्थापनेच्या घडामोडीत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असून,मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रीपदाच्या रूपाने लाल दिवा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी चे अनेक आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाले असून पक्षाच्या ९ मंत्र्यांनी शपथ

घेतली असून यात खान्देशातून एकमेव अमळनेर विधानसभेचे अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
आमदार अनिल पाटील यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले.पक्षाने पुन्हा जबाबदारी देत मुख्य प्रतोद पदी निवड केली.आणि आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान प्राप्त झाले आहे.

अजित पवारांचे कट्टर समर्थक
अनिल भाईदास पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यातच २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी आमदार अनिल पाटील शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत होते.विधानसभा तसेच विधानभवनाबाहेरील आक्रमकपणा यामुळे आमदार अनिल पाटील यांचा मंत्रीपदाचा मार्ग अजून सुकर झाला.

कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना

आमदार अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी तसेच शक्तीप्रदर्शनासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत

अमळनेरात जल्लोष
आमदार अनिल पाटील यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्याने अमळनेर येथील पक्ष कार्यालय व निवासस्थानाबाहेर जि.प.सदस्या जयश्री पाटील याच्यासमवेत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!