आजचा सत्कार समारंभ स्थगित

अमळनेर(प्रतिनिधि)
अमळनेर तालुका मराठा समाजातर्फे आज दि 3 रोजी आयोजित सत्कार समारंभ नव्यानेच मंत्रीपदी विराजमान झालेले ना. अनिलदादा पाटील उपस्थित राहू शकणार नसल्याने आणि सदर सत्कार सोहळा मंत्री महोदयांच्या हस्तेच व्हावा असा सगळ्यांचा आग्रह असल्याने आजचा सत्कार सोहळा तात्पुरता स्थगित करण्यात आला असून मंत्री महोदयांकडून तारीख मिळाल्यानंतर पुढील तारखेची घोषणा केली जाणार आहे. सदर कार्यक्रमात मंत्री महोदयांचा देखील सत्कार होणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. तरी कृपया नोंद घ्यावी ही विनंती.