प्रताप कॉलेज जवळील उड्डाण पूलावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे .. बांधकाम विभाग कसली वाट पाहात आहे…

अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर येथील धार मारवड रस्त्यावरील प्रताप कॉलेजकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करावा लागतो, मात्र या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर पडावे लागत आहे. संततधार पावसामुळे त्या उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. पाऊस पडला की त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि येणाऱ्या-जाणाऱ्या मोटारसायकल, दुचाकी वाहने त्या खड्ड्यांमध्ये अडकतात आणि त्या खड्ड्यांमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे खड्डे मोठ्या अपघाताचे कारण बनू शकतात. त्या उड्डाणपुलाखालून रेल्वे मार्ग जातो. खड्ड्यांमुळे पूल कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.तसेच धार मारवड शिरपूर अशी अनेक गावांना जोडणारा हा पुल आहे या उड्डाण पूलावर तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.